२३ तारखेपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा उभा करणं कठीण, वाचा काय झालाय प्रॉब्लेम

२३ तारखेपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा उभा करणं कठीण, वाचा काय झालाय प्रॉब्लेम

मुंबई : कुलाबा येथील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयासमोर आणि रीगल जवळच्या कारंज्याजवळ बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेने डिसेंबर २०१९ रोजी मंजूर केला होता. बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या जन्मदिवसापर्यंत म्हणजेच २३ जानेवारीपर्यंत उभा केला जावा अशी इच्छा व्यक्त केल्या जात होती. मात्र आता बाळासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजेच २३ तारखेला बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा होऊ शकणार नाही अशी चिन्ह दिसत दिसतायत. याबाबतची माहिती सूत्रांकडून मिळतेय. बृहन्मुंबई महानगरपालिकेला अजूनही या संबंधीच्या परवानगी मिळाल्या नाहीत त्यामुळे, जोपर्यंत या परवानगी मिळणार नाही तोपर्यंत बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा करता येणार नाहीये.

मोठी बातमी : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा 'मोठा निर्णय'; दिले आदेश!
 
कोणकोणत्या परवानग्या बाकी आहेत ?
 
मुंबई महानगरपालिकेने या पूर्णाकृती पुतळ्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. मात्र, अद्यापही गृह मंत्रालयाकडून याबाबत मंजूरी मिळालेली नाही. विशेष म्हणजे राज्यात स्वतःचं सरकार असूनसुद्धा ही मंजुरी मिळालेली नाही 

याचसोबत बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा हा मुम्बामधील हेरिटेज साईट म्हणून घोषित असलेल्या जागी उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबई हेरिटेज कन्जर्वेशन कमिटीकडे (एमएचसीसी) या संबंधीचा प्रस्ताव पाठवला आहे. MHCC कडून देखील कुठल्याही प्रकारची परवानगी अद्याप आलेली नाहीये.  

अशी असेल बाळासाहेबांची प्रतिमा:
 
दोन फुटाच्या गवताच्या मंचावर ११ फुटी पोडियम आणि काचेसारखा पारदर्शी मंच तयार केला जाणार आहे. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फुट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

या आधी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या प्रतिमेसाठी १०० कोटींची मंजूरी दिली आहे. मात्र आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं  सरकार असूनही या संबंधीच्या परवानगया अद्याप आलेल्या नाहीत. महाविकासाघाडीचं सरकार स्थिर जास्त वेळ लागल्यामुळे या परवानगी अजूनही मिळालेल्या नाहीत अशी माहिती मिळतेय.
 
लवकरात लवकर या संबंधीच्या परवानगी घेण्यात येतील आणि ही बाळासाहेबांची प्रतिमा स्थापन करण्यात येईल असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हंटलय.

कुणी साकारलाय बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा 

कलानगर येथील सुप्रसिद्ध वास्तूशिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारताना त्यांच्यासमोर अनेक आव्हान होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभेला आल्यावर जनसमुदायला संबोधतानाचे भाव आणणं हे सर्वांत मोठं कठीण काम असल्याचं वडके यांनी सांगितलंय. बाळासाहेब हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तीमत्व आहेत, त्यामुळे त्यांची हुबेहूब मूर्ती करणे हे एक आव्हान होतं. असंही शशिकांत वडके यांनी म्हटलंय.

it is difficult to establish full statue of balasaheb thackeray before bith anniversary ie23rd january  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com