मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात ड्रोनवर बंदी | Mumbai police update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drones

मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात ड्रोनवर बंदी

मुंबई : मिरा भाईंदर (Mira-bhayandar), वसई-विरार (vasai-virar) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत (police commissioner office area) राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी (people protection) या परिसरात ड्रोन (drone), पॅरा ग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरियल मिसाईल्सना बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा: NCB विरोधात काय म्हणालं हायकोर्ट? आर्यनच्या जामीन आदेशातील दहा प्रमुख मुद्दे

गुन्ह्यासाठी अनेक गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. ड्रोन यासाठी सर्वात सोपे आण सोयीचे साधन समजले जाते. त्यामुळे त्याच्या साह्याने नागरिकांच्या जिवाला, आरोग्याला धोका होऊ नये, सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी १७ नोव्हेंबरपासुन ११ जानेवारीपर्यंत ही बंदी असणार आहे. पोलिसांच्या सर्वेक्षणासाठी तसेच आयुक्तांच्या परवानगीने ड्रोन वापरता येणार आहेत.

loading image
go to top