मुंबई : पोलिसांना १५ लाखांत स्वमालकीची घरे देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेंतर्गत ही घरं देण्यात येणार आहेत.
Chief Minister Eknath Shinde mumbai
Chief Minister Eknath Shinde mumbaisakal

मुंबईतल्या वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्यात येत आहे. या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेंतर्गत पोलिसांना स्वमालकीची घर मिळणार आहेत. या घरांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यानं आता १५ लाखांमध्ये ही घर पोलिसांना देण्यात येतील अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. (Mumbai Police will get self owned house in 15 lakhs CM Eknath Shinde announces in VidhanSabha)

Chief Minister Eknath Shinde mumbai
मराठीला त्वरीत 'अभिजात दर्जा'द्या; मुख्यमंत्र्यांची PM मोदींना विनंती

मुख्यमंत्री म्हणाले, बीबीडी चाळीच्या पुनर्विकास योजनेतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न २०२१ पासून प्रलंबित होता. यातील बावीसशे घरं पोलिसांना मालकी तत्वावर देण्यात येणार आहेत. पण या घरांच्या किंमती पोलिसांना परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळं आधी ५० लाख रुपये किंमत असलेल्या या घरांची किंमत २५ लाखांवर आणण्यात आली. पण ही किंमतही अधिक असल्यानं आता ही घरं १५ लाखांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

काय आहे बीडीडी चाळींचा प्रश्न?

दरम्यान, गेल्या महिन्यात लोअर परेल येथील ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला कंत्राटदाराने सुरुवात केली. मात्र रहिवाशांकडून सहकार्य मिळत नसल्याने कंत्राटदाराने काम सुरू करण्यासाठी आणलेली यंत्रसामुग्री हलवली होती. त्यामुळं रहिवाशांना प्रकल्प रखडण्याची भीती वाटू लागली असून म्हाडाने प्रकल्पाला गती देण्याची मागणी रहिवासी करत आहेत.

Chief Minister Eknath Shinde mumbai
औरंगाबाद, उस्मानाबाद अन् नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठराव मंजूर

वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्यात येत आहे. वरळी, नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम रखडले होते. काही महिन्यांपूर्वी येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. त्यानुसार ललित कला भवनाच्या मैदानावर पत्रे मारण्यात आले तर ११ नंबरची इमारत पूर्णपणे तोडण्यात आली आहेत.

Chief Minister Eknath Shinde mumbai
UP : भूपेंद्र सिंह भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; योगी बदलणार जातीय समीकरणे?

इथे ३२ इमारती असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १० इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम वेगाने होण्यासाठी सात इमारती रिकाम्या कराव्या लागणार आहेत. त्यापैकी २ इमारती ९० टक्के रिकाम्या झाल्या आहेत. रहिवासी इमारती रिकाम्या करत नसल्याने कंत्राटदाराने येथील कामासाठी आणलेली यंत्रसामुग्री परत नेली आहे. या गतीने प्रकल्पाचे काम सुरू राहिले, तर प्रकल्प कधी पूर्ण होईल, असा सवाल रहिवासी करत आहेत. यामध्ये म्हाडा अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी ना. म. जोशी मार्ग पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com