Mumbai Police : योगेंद्र आणि योगेश साटम यांच्या छायाचित्रांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले दोन कॉन्स्टेबल त्यांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी व वन्य जीवनातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत.
Yogendra Satam and Yogesh Satam Brothers
Yogendra Satam and Yogesh Satam BrothersSakal
Summary

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले दोन कॉन्स्टेबल त्यांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी व वन्य जीवनातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत.

मुंबई - मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले दोन कॉन्स्टेबल त्यांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी व वन्य जीवनातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांना छायाचित्रणात आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. योगेंद्र आणि योगेश साटम अशी त्यांची नावे. दोघे जुळे भाऊ असून मुंबई पोलिस दलातील नोकरी सांभाळून ते आपला अनोखा छंद जोपासत आहेत. मुंबईतील आरेच्या जंगलातील अनेक रोमहर्षक छायाचित्रे त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. त्यांनी काढलेले बिबट्याचे छायाचित्र कलाप्रेमींची दाद मिळवून गेले.

मरोळ पोलिस वसाहतीत साटम बंधू राहतात. त्यांचा जन्म मुंबईचा. मरोळ वसाहतीतच त्यांचे बालपण गेले. पवईतील शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी मरोळ वसाहतीतून पवईच्या शाळेत जाणारा रस्ता जंगलातून जात असे. त्यामुळे वन्य जीवन आणि जंगलाबद्दलचे विशेष आकर्षण त्यांच्यात लहान असतानाच निर्माण झाले. त्यातूनच छायाचित्रणाचा छंद त्यांना जडला. आरे जंगलात त्यांची वारंवार भ्रमंती होत असे. मुंबईतील जंगल त्यांनी लहानपणापासून जवळून पाहिले आहे. साहजिकच तिथेच त्यांची छायाचित्रणाची आवड फुलत गेली.

सर्पमित्र म्हणूनही ओळख

साटम बंधू केवळ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर नसून सर्पमित्रही आहेत. ते सांगतात, लहानपणापासून बऱ्याच वेळा जंगलाच्या रस्त्याने शाळेत जाताना त्यांना साप दिसायचे. तेव्हा सापांच्या वर्तनाचे ते बारीक निरीक्षण करायचे. त्यांच्या मित्राने त्यांना सापासंदर्भात एक पुस्तक दिले. त्याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. आता ते आरे जंगलाच्या लगत मानवी वस्तीत सर्पमित्र म्हणून काम करतात.

दुर्मिळ प्रजातींचे संशोधन

योगेंद्र साटम आरेमध्ये सापडणाऱ्या दुर्मिळ कोळ्यांच्या प्रजातीवर संशोधन करत आहेत. त्यांच्या मते, आरे कॉलनीत अतिशय दुर्मिळ प्रजातींचे कोळी पाहायला मिळतात. एवढेच नव्हे; तर ते तेथील दुर्मिळ पालींवरही संशोधन करत आहेत. चार ते पाच वेगवेगळ्या विंचूंच्या प्रजातीही योगेंद्र यांना त्यांच्या निरीक्षणात आढळल्या आहेत.

मानवी वस्तीत बिबट्यांविषयी जागृती

आरे कॉलनीतील जंगलाच्या लगत राहणाऱ्या मानवी वस्त्यांमध्ये बऱ्याच वेळा बिबटे पाहायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर साटम बंधू बिबट्यांचा मानवाशी संघर्ष होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत. मानवी वस्तीमध्ये ते बिबट्यांबाबतची परिस्थिती हाताळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवतात. त्यांच्या मते आरे कॉलनीतील बिबट्यांची संख्या वाढलेली आहे; परंतु जंगलाचे क्षेत्र अपुरे आहे. जर संघर्ष टाळायचा असेल तर जंगलाचे क्षेत्र वाचवणे गरजेचे आहे.

बिबट्याच्या छायाचित्रणासाठी पुरस्कार

योगेंद्र आणि योगेश साटम यांनी आरेच्या जंगलात बिबट्यापासून घुबडांपर्यंतची छायाचित्रे खास मोशन कॅमेऱ्याद्वारे काढली आहेत. त्यांनी काढलेल्या बिबट्याच्या छायाचित्राला २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. पोलिस दलात कार्यरत असणे साटम बंधूंसाठी अभिमानाची बाब आहे; परंतु कामातील तणावानंतर दोघे जंगलात आपले मन रमवतात. जंगलात छायाचित्रण करताना त्यांची अनेक तरुण छायाचित्रकारांशी भेट झाली, त्यांची मैत्री झाली आणि त्यांचा एक ग्रुप बनला. आता ग्रुपमधील सर्व सदस्य मिळून जंगलातील वाईल्ड फोटोग्राफीत रमतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com