निवडणुकीच्याआधी मनसेत मोठा राजकीय भूकंप! राजकीय विश्लेषक म्हणतात ही तर धोक्याची घंटा

सुमित बागुल
Monday, 25 January 2021

येत्या काळात ज्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुका येऊ घातल्यात त्यामध्ये मुंबईसह मुंबईतील उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेचाही समावेश आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न सर्वच उपस्थित करतायत. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तब्बल 320 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलाच हादरा बसलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नुकत्याच पक्षनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये मोठी नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. एकूण 320 पदाधिकाऱ्यांमध्ये उपशहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विभाग प्रमुखांचा समावेश आहे.    

महत्त्वाची बातमी : नाना पटोलेंच्या नव्या डिमांडमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज ? जाणून घ्या काय आहे ही कथित मागणी

येत्या काळात ज्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुका येऊ घातल्यात त्यामध्ये मुंबईसह मुंबईतील उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेचाही समावेश आहे. अशात आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच मनसेमध्ये मोठा राजकीय भूकंप आल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व पक्ष निवडणुकांच्या तयारीस जोमाने  लागलेत.   

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

याबाबत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पदांचे वाटप करताना स्थानिकांना विश्वासात घेतले गेले नाही, असं पदाधिकारी म्हणतायत. म्हणूनच एकत्रच 234 गट अध्यक्ष, 58 उपशाखा अध्यक्ष, 6 उपविभाग अध्यक्ष,  4 विभाग अध्यक्ष, 2 विभागीय संघटक आणि 5 शाखाध्यक्ष यांनी एकत्रच राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुपूर्द केले आहेत.

दरम्यान विविध राजकीय विश्लेषकांच्यामते मनसेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसैनिक बाहेर पडणे  हे पक्षाची चिंता वावाढवणारं असल्याचं बोललं जातंय.  

mumbai political news 320 mns party workers resigned from kalyan dombivali


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news 320 mns party workers resigned from kalyan dombivali