नाना पटोलेंच्या नव्या डिमांडमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज ? जाणून घ्या काय आहे ही कथित मागणी

नाना पटोलेंच्या नव्या डिमांडमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज ? जाणून घ्या काय आहे ही कथित मागणी

मुंबई : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले  यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते दिल्लीत वरिष्ठांना देखील भेटले होते. या भेटीनंतर नाना पटोले यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार हे निश्चित झालं होतं. मात्र, आता नाना पटोले यांनी पक्षाकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासोबतच एका कॅबिनेट मंत्रिपदाची देखील मागणी केल्याचं समजतंय. त्यामुळे नाना पटोले यांच्या मागणीबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी काहीसे नाराज असल्याचं देखील सूत्रांकडून समजतंय. 

एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार हे निश्चित आहे. मात्र प्रदेशाध्यक्षपदासोबत नाना पटोले यांनी  काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण किंवा काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापैकी एक मंत्रिपद हवं असल्याचं समजतंय. यामुळेच प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही किंवा लांबणीवर टाकल्याचे वृत्त आहे.

सध्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आहे. बाळासाहेब थोरात यांच्याच काळामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्यात. काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकर स्थापन केलंय. अशात बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदासोबत मंत्रिपद आणि विधिमंडळाचे गटनेतेपद देखील आहे. काँग्रेमध्ये पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष असावा यासाठी नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार होती अशी चर्चा होती. मात्र आता नाना पटोले यांच्याबाबत समोर येणाऱ्या माहितीनंतर काँग्रेसमध्ये नक्की चाललंय काय असा प्रश्न जाणकार उपस्थित करतायत. 

mumbai political news congress party leader upset over Nana patoles new demand

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com