'तो' एकटा ठरला दहा जणांसाठी देवदूत, मुंबईतील एका देवदूताची पॉझिटिव्ह स्टोरी

'तो' एकटा ठरला दहा जणांसाठी देवदूत, मुंबईतील एका देवदूताची पॉझिटिव्ह स्टोरी
Updated on

मुंबई : गंभीर कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा वरदान ठरतंय. प्लाझ्माचे महत्व ओळखून एका दात्याने तब्बल 10 वेळा प्लाझ्मा दान केला आहे. त्यामुळे 10 रुग्णांचे प्राण वाचले आहेत. तब्बल 10 वेळा प्लाझ्मा दान करणारे ते पहिले मुंबईकर ठरले आहेत.

मुंबईतील 33 वर्षीय भावेश भानुशाली असे प्लाझ्मा दात्याचे नाव आहे. भावेश हे व्यावसायिक असून ते अंधेरी पूर्व येथे राहतात. त्यांनी आतापर्यंत 10 वेळा प्लाझ्मा दान केला असून त्यांच्या प्लाझ्मा दानामुळे 20 गंभीर रुग्णांना जीवदान मिळाले आहे. जून महिन्यात भावेश स्वतः कोविड पॉझिटिव्ह ठरले. त्यांची स्वतःची स्थिती देखील गंभीर होती. मात्र त्यांना दिलेला प्लाझ्मा आणि उपचार यामुळे ते यातून बरे झाले. बरे झाल्यानंतर आपणही प्लाझ्मा दान करून रुग्णांना मदत करण्याचे त्यांनी ठरवले. 

भावेश यांनी ऑगस्टमध्ये पहिल्यांदा प्लाझ्मा दान केला. प्लाझ्मामुळे अनेक गंभीर रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी प्लाझ्मा दान सुरूच ठेवले. आतापर्यंत त्यांनी 10 वेळा प्लाझ्मा दान केला आहे. 

शरीरातील IMG पातळी 6 च्या वर असेल तर ती व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी योग्य समजली जाते. एका वेळी 400 एमएल प्लाझ्मा घेतला जातो. भावेश यांची आयएमजी पातळी 6 च्या वर असल्याने ते पंधरा दिवसातून एकदा आणि महिन्यातून दोनदा प्लाझ्मा दान करतात.

भावेश यांच्या घरी आई-वडील,पत्नी व दोन भाऊ आहेत. त्यांच्या कुटुंबियांना प्लाझ्मा दानाचे महत्व पटल्याने त्यांनी भावेश यांना प्लाझ्मा दानासाठी प्रोत्साहित केल्याचे भावेश सांगतात. सुरुवातीला किती वेळा प्लाझ्मा दान करायचे याबद्दल काही विचार केला नव्हता. मात्र आपल्या दानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचत असल्याने आपलं प्लाझ्मा दान सुरू ठेवले, असेही ते पुढे म्हणाले.

भावेश यांच्या शरीरात प्रतिजैविके (अँटीबॉडी) तयार होण्याचे प्रमाण चांगले आहे. प्रत्येक 15 दिवसांनी भावेश यांच्या शरीरात प्रतिजैविके तयार होत असल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवाय प्लाझ्मा दानामुळे त्यांच्या ही शरीरावर कोणत्याही प्रकार दुष्परिणाम झाला नसल्याचे भावेश सांगतात, त्यामुळे पुढे देखील शक्य तितक्या वेळी प्लाझ्मा दान सुरूच ठेवणार असल्याचे ही भावेश यांनी सांगितले.

mumbai positive story man from andheri gave plasma to ten people and saved life

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com