

Rohit Arya Encounter case
esakal
Mumbai hostage: मुंबईतल्या पवईमध्ये एका स्टुडिओत ऑडिशनसाठी बोलावलेल्या १७ मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं. रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी हा उद्योग केला होता. रोहितची सरकारच्या शिक्षण विभागाकडे २ कोटी रुपयांची बाकी होती, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यापोटी त्याने मुलांच्या जीव धोक्यात घातला होता. त्याने रुमममध्ये ज्वलनशील रसायन ओतलं होतं. त्यामुळे तो काहीही करु शकतो, अशी भीती पोलिसांना होती.