Vaccination Updates: मुलांच्या लसीकरणात अडथळे

मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोविड- १९ लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
Under 18 Vaccination
Under 18 VaccinationSAKAL
Updated on

दरम्यान मुंबईला लागून असलेला ठाणे जिल्हा मात्र लसीकरणात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात आतापर्यंत ४५ हजार १२९ मुलांचे लसीकरण झाले असून, मुंबईत मात्र १४ हजार ९८७ मुलांच्या लसीकरणाची नोंद झाली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने प्रोजेक्ट मुंबईशी करार केला आहे. आजपासून शाळांमध्ये मोहीम राबवली जात आहे. दररोज ५०० ते ६०० लहान मुलांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे त्यांच्या पालकांना पालिकेकडून सांगितले जात आहे, पण पालक वेगवेगळी कारणे देत लसीकरण टाळत असल्याचे पालिकेतल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोविडचे रुग्ण कमी होत असल्याने लसीकरण करून घेण्यास पालक उत्सुक नाहीत. तसेच मुलांची परीक्षा असल्याचे कारणही त्यांच्याकडून दिले जात आहे. काही पालकांना लसीच्या सुरक्षिततेबद्दल विश्वास नाही. लसीचे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतील, असे काही पालकांना वाटत आहे. संकोच आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे मुलांच्या लसीकरणाचा वेग मंदावत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

‘आम्ही पूर्ण गतीने लसीकरण मोहीम राबवण्यास खूप उत्साही आहोत, परंतु पालक त्यांच्या मुलाच्या लसीकरणात अनास्था दाखवत आहेत. १५ ते १८ वर्षे वयोगटातील लसीकरण मोहीम सुरू असताना आम्ही नागरिक आणि पालकांमध्ये जनजागृती करत होतो, परंतु तरीही पालक पुढे येण्यास संकोच बाळगत असल्याने आणि त्यांची इच्छा नसल्यामुळे लसीकरण मोहीम इतरांच्या तुलनेत संथगतीने सुरू आहे, असे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

सर्वांत कमी लसीकरण

  • अमरावती १३,८०६

  • मुंबई १४,९८७

  • नागपूर १६,३२५

  • पालघर १७,२२९

  • धुळे १७,६४९

  • लातूर २७,६६७

सर्वाधिक लसीकरण

  • नाशिक ८२,५२३

  • पुणे ७९,९३९

  • अहमदनगर ७१,७६७

  • कोल्हापूर ५५,९१६

  • ठाणे ४५,१२९

१६ ते २५ मार्चदरम्यान मुंबईत झालेले लसीकरण

  • मार्च १६ ११७

  • मार्च १७ ४१६

  • मार्च १९ ९९९

  • मार्च २१ १६४८

  • मार्च २२ १६४२

  • मार्च २३ १७१६

  • मार्च २४ २१३५

  • मार्च २५ ६०५४

१२-१४ वयोगटातील लसीकरण संथगतीने होत आहे. त्यामुळे मुलांना लसीकरण करून मोहिमेला गती देण्यासाठी आम्ही पालिकेशी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. शाळांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आम्हाला खूप आनंद झाला. शुक्रवारपासून लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाली. जी मुंबईतील चार वेगवेगळ्या ठिकाणी दररोज सुरू राहील. आम्ही दररोज सुमारे ५०० ते ६०० लसीकरणाची अपेक्षा करत आहोत. ज्यामुळे या वयोगटातील लसीकरण संख्येत नक्कीच वाढ होईल.

- शिशिर जोशी, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com