
बार्शी : मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत आले आहेत. यामुळे मुंबईतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. काही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. दरम्यान, एक आंदोलक तरुण त्याच्या रेड्यासह आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालाय. त्याला आझाद मैदानावर जाण्यापासून पोलिसांनी अडवलं आहे. सादिक तांबोळी असं तरुण आंदोलकाचं नाव आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बार्शी(जि.सोलापूर)येथूून मित्रपरिवारांसह बादशाह रेड्याला सोबत घेऊन तो मुंबईत आलाय.