राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे- हायकोर्ट

Mumbai High Court
Mumbai High CourtSakal

मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) सार्वजनिक ठिकाणी (public place) वाढत चाललेल्या गर्दीबाबत (crowd) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारने (Maharashtra government) वेळीच सावध होऊन यावर नियंत्रण आणावे अन्यथा दुसऱ्या लाटेसारखी (Corona situation) परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने सरकारला दिला.

Mumbai High Court
आशियातील नामांकित आंतरमहाविद्यालयीन 'मल्हार' महोत्सव संपन्न; वाचा सविस्तर

शहर उपनगरामध्ये होणारी नागरिकांची वाढती गर्दी आणि तिसर्या लाटेचा संभाव्य धोका यावर उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य न्या दिपांकर दत्ता, न्या ए ए सय्यद, न्या के के तातेड आणि न्या पी बी वार्ले यांच्या पूर्ण पीठाने आज एका बैठकीत संपूर्ण परिस्थिती चा आढावा घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून राज्य सरकार, प्रशासनाने धडा घ्यायला हवा. अन्यथा पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मत पूर्ण पीठाने व्यक्त केले.

सोमवारी राज्य सरकारच्या टास्क फोर्स सदस्यांसह आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या डॉ राहुल पंडित यांच्या सह पूर्णपीठाची बैठक झाली. यामध्ये वरिष्ठ सरकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तिसरी लाट आपल्यापुढे कधीही धडकू शकते असा इशारा या बैठकीत तज्ञांनी व्यक्त केला आहे, असे मुख्य न्यायमूर्तींनी सांगितले. जर याबाबत सुरक्षेचे सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वे पाळले नाही तर राज्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे ही या बैठकीत सांगण्यात आले. विशेष म्हणजे एप्रिल 2022 पर्यंत कोविड19 चा धोका देशात राहण्याची शक्यता डॉ पंडित यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai High Court
राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार

वर्तमानपत्रामध्ये जुहू, गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्ह चे जे फोटो प्रसिद्ध होत आहेत ते चिंताजनक आहेत. या छायाचित्रांमध्ये लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याचे दिसत आहे आणि हे धोकादायक आहे. जर राज्य सरकारने या गर्दिवर नियंत्रण आणले नाही आणि त्याला प्रतिबंध केला नाही तर पुन्हा मागील दुसऱ्या लाटेसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा स्पष्ट इशारा पूर्णपीठाने दिला.

राज्यातील विविध जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित असलेल्या अनधिकृत बांधकाम, पाडकाम, लिलाव आदींवरील स्थगिती आदेश न्यायालयाने सप्टेंबर पर्यंत वाढविला आहे. नागरिकांना न्यायालयात दाद मागणे या परिस्थितीमध्ये शक्य नाही, सध्याची परिस्थिती, सणासुदीचे दिवस यामध्ये नागरिकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी न्यायिक द्रुष्टीने हा अंतरिम दिलासा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पूर्ण पीठाची पुढील बैठक ता. 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. सोमवारी मुंबई मध्ये 334 कोरोना रुग्ण आढळले तर आतापर्यंत एकूण संख्या 743832 रुग्णांची नोंद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com