Railway News: रेल्वेच्या महाव्यवस्थापकाकडून कर्जत-लोणावळा घाटातील मान्सूनपूर्व कामाची पाहणी

Karjat-Lonavala Ghat News: घाट विभागात असलेले रेल्वेचे ५२ बोगदे, २५० मीटर उंच खडक आणि तीव्र चढ-उतार असलेला हा भाग मुंबई विभागाच्या कामकाजासाठी महत्त्वाचा आहे. The Ghat section has 52 railway tunnels, 250 meters high rocks and sharp ups and downs.
Railway News
Railway News

Mumbai News: कर्जत-लोणावळा घाटातील मान्सूनपूर्व कामाची पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक राम करण यादव यांनी शुक्रवारी केली आहे. यावेळी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

घाट विभागात असलेले रेल्वेचे ५२ बोगदे, २५० मीटर उंच खडक आणि तीव्र चढ-उतार असलेला हा भाग मुंबई विभागाच्या कामकाजासाठी महत्त्वाचा आहे.

Railway News
Railway News: डबे उपलब्ध नसल्याने एलटीटी थिविम एक्सप्रेस तब्बल ८ तास लेट; समर स्पेशल गाड्याचा गोधळ!

त्यामुळे कर्जत-लोणावळा घाटातील मान्सूनपूर्व कामाची पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक राम करण यादव यांनी केली. याशिवाय यादव यांनी मंकी हिल बोगदा घाटाची ही पहाणी केली, हा भाग मुंबई आणि पुण्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

प्रथमच महाव्यवस्थापक स्तरावरील अधिकारी पहाण्यासाठी घाटमाथ्यावर तपासणीसाठी आले. शुक्रवारी पहाटे ५.०० वाजता सुरु झालेली मोहीमेने पहाटेपासून घाटमाथ्याचे सकाळी ७.०० पर्यंत सुमारे ३.५ किमी अंतर कापले. मंकी हिल केबिन ते ठाकूरवाडी सर्वात महत्वाचा भागाची यादरम्यान पाहाणी करण्यात आली.

Railway News
Konkan Railway: थिविम ते एलटीटी रेल्वे धावली सहातास उशीराने

सध्या सुरू असलेल्या नाल्यांच्या साफसफाईवरून मध्य रेल्वेची सक्रिय देखभाल करण्याची वचनबद्धता दिसून येते, जी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, नवीन ड्रेनेज नाल्यांचे बांधकाम सुरू आहे, सुरक्षा उपायांना आणखी मजबूत करणे.

Railway News
Kokan Railway Breaking: चिपळूण -करंजाडी दरम्यान कोकण रेल्वेचा मेगा ब्लॉक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com