मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

mumbai pune express way accident
mumbai pune express way accidentsakal
Updated on
Summary

ट्रक आणि टेम्पोच्या मधे सापडून कारचा चुराडा झाला. यात कारमधील चौघांचा मृत्यू झाला.

लोणावळा :  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळ बुधवारी (ता.१५) सकाळी सहा वाहने ऐकमेकांवर आदळून झालेल्या विचीत्र अपघातात चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आठ जण जखमी झाले आहे. अगदी सकाळीच अपघाताची घटना झाल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. गौरव खरात (वय-३६), सौरभ तुळसे (वय-३२), सिद्धार्थ राजगुरू वय-३१, सर्व रा. सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाचे नाव समजू शकले नाही. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार बोरघाटात आडोशी बोगद्याच्या पुढे खोपोली एक्झिटजवळ ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक  द्रुतगती मार्गाच्या कडेला थांबला होता.

याचदरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणाऱी वाहने अचानक थांबल्याने उतारावर एका ट्रकचालकाचे येथील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जात असलेल्या स्विफ्ट कार आणि एका टेम्पोवर जोरात आदळला. यादरम्यान सहा वाहने ऐकमेकांवर आदळली. या अपघातात दोन मोटारींचा चक्काचूर झाला. या विचित्र अपघातात चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील तिघेजण गंभीर जखमी तर टेम्पो मधील चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिस मदत केंद्राचे फौजदार महेश चव्हाण, महामार्ग पोलिस कर्मचारी, देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचारी, खोपोली पोलीस घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना तत्काळ उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com