esakal | मुंबई-पुणे डायबिटीसच्या उंबरठ्यावर, प्री-डायबिटीज मेलिटसच्‍या प्रमाणात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-पुणे डायबिटीसच्या उंबरठ्यावर, प्री-डायबिटीज मेलिटसच्‍या प्रमाणात वाढ

मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, अहमदनगर, रत्‍नागिरी आणि नाशिक या शहरांत या तपासण्या करण्यात आल्या. यात 18 वर्षावरील 9,294 व्यक्तींची तपासणी करण्‍यात आली. मुंबईमध्‍ये 2941 तर पुण्‍यातील 1436 व्‍यक्‍तींची तपासणी करण्‍यात आली. 

मुंबई-पुणे डायबिटीसच्या उंबरठ्यावर, प्री-डायबिटीज मेलिटसच्‍या प्रमाणात वाढ

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण आणि शहरी भागांमध्‍ये प्री डायबीटीज मेलिट्सचा (पीडीएम) प्रभाव वाढल्याने राज्य डायबिटीसच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ग्रामीण भागामधील प्रमाण शहरी भागांपेक्षा काहीसे उच्‍च आहे. राज्यातील एकूण पीडीएम प्रमाण 24 टक्‍के असल्याचे समोर आले आहे.  इंडस हेल्‍थ प्‍लस या कंपनीने केलेल्‍या हेल्‍थकेअर तपासण्‍यांमध्ये हा निष्कर्ष समोर आला आहे.

हेल्‍थकेअर तपासण्‍यांच्‍या आधारावर मधुमेह प्रमाणांचे निरीक्षण या चाचण्यांच्या माध्यमातून करण्यात आले. हे निरीक्षण जून 2019 ते ऑक्‍टोबर 2020 कालावधीदरम्‍यान महाराष्‍ट्रातील प्री-डायबिटीज मेलिटस (पीडीएम) संदर्भात करण्यात आले. राज्यातील एकूण पीडीएम प्रमाण 24 टक्‍के तर प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य तपासण्‍या केलेल्‍या लोकांमध्‍ये डायबिटीज मेलिटसचे (डीएम) प्रमाण 17 टक्‍के आहे. 

प्री-डायबिटीज मेलिटसचे प्रमाण महिलांच्‍या तुलनेत पुरूषांमध्‍ये 1.3 पट अधिक आहे. मधुमेह हा सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये आढळून येणारा आजार बनत आहे आणि म्‍हणनूच, जीवनशैलीमध्‍ये बदल, नियमित व्‍यायाम, आरोग्‍यदायी आहाराचे सेवन आणि धूम्रपान टाळणे आवश्‍यक असल्याचे इंडस हेल्‍थ प्‍लसचे जेएमडी व प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थकेअर स्‍पेशालिस्‍ट अमोल नायकवडी यांनी सांगितले.

सध्‍याच्‍या महामारीदरम्‍यान आपण लवकर तपासणी आणि नियमित कालांतराने प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य तपासणी करणे महत्त्वाचे आहे, ज्‍यामुळे या आजाराचे प्रमाण कमी होण्‍यामध्‍ये मदत होईल असे ही ते पुढे म्हणाले.

मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, अहमदनगर, रत्‍नागिरी आणि नाशिक या शहरांत या तपासण्या करण्यात आल्या. यात 18 वर्षावरील 9,294 व्यक्तींची तपासणी करण्‍यात आली. मुंबईमध्‍ये 2941 तर पुण्‍यातील 1436 व्‍यक्‍तींची तपासणी करण्‍यात आली. 
 
संशोधनातील ठळक निष्कर्ष: 

  • एकूण तपासण्‍यांमध्‍ये 61 टक्‍के पुरूष आहेत आणि 39 टक्‍के महिला आहेत 
  • महाराष्‍ट्राच्‍या अर्ध-शहरी भागांमधून 65 टक्‍के  तर 35 टक्‍के प्रमाण शहरी भागांमधून आढळून आले
  • तपासणी केलेल्‍या व्‍यक्‍तींचे सरासरी वय 45 वर्षे आहे 
  • प्री-डायबिटीज मेलिटस (पीडीएम)चे प्रमाण
  • प्री-डायबिटीज मेलिटसचे एकूण प्रमाण 24 टक्‍के आहे (28 टक्‍के पुरूष आणि 20 टक्‍के महिला)

मुंबई आणि  पुण्यातील पीडीएमचे प्रमाण

मुंबई: पुरूष: 25 टक्‍के, महिला: 20 टक्‍के

पुणे: पुरूष: 28 टक्‍के, महिला: 21 टक्‍के 

अधिक वाचा- मध्य रेल्वे मार्गावर अत्याधुनिक उत्तम रॅक, महिलांच्या डब्यांत CCTVची नजर

अर्ध-शहरी आणि शहरी भागांमध्‍ये नोंदणी करण्‍यात आलेल्‍या पुरूष आणि महिलांचे वितरण 

अर्ध-शहरी: पुरूष: 27 टक्‍के, महिला: 21 टक्‍के 

शहरी: पुरूष: 26 टक्‍के, महिला: 20 टक्‍के

प्रमुख कारणीभूत घटक

तणाव, लठ्ठपणा, एरेटेड पेय, मद्यपान, जंकफूडचे सेवन, शारीरिक व्‍यायामचा अभाव आणि उच्‍च प्रमाणात साखरेचे सेवन हे आहेत.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Pune Increase in pre-diabetes mellitus total PDM ratio 24 Maharashtra