

Atal Setu-Mumbai Pune Expressway Connector
ESakal
मुंबई : एमएमआरडीएकडून अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेदरम्यान ७.३५ किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत जोडमार्ग उभारला जात आहे. त्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत सुमारे ६० ते ९० मिनिटांची बचत होणे अपेक्षित आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यानची वाहतूक वेगवान होणार आहे.