
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईतील डम्पिंग ग्राउंडमध्ये जमा होणारा दोन लाख मेट्रिक टन कचरा कमी करण्यासाठी महापालिका कचरा ते वीज आणि बायोगॅस प्रकल्पांवर काम करत आहे. केंद्र सरकारच्या सूचना आणि राज्य सरकारच्या मदतीने देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये नऊ एकर जागेवर ‘वेस्ट टू पॉवर प्लांट’ उभारण्यात येत आहे.
केंद्र सरकारने या ठिकाणी चार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. पालिकेने केंद्र सरकारकडे दररोज आठ मेगावॉट वीजनिर्मिती करण्याची मागणी करणारा प्रस्ताव पाठवला होता, तो केंद्र सरकारने फेटाळला आहे.