Mumbai : महिला रेल्वे प्रवाशांचा काळ्या फित लावत प्रवास

महिला दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाचा केला निषेध
Railway
Railway sakal

डोंबिवली : घर चालविण्यासाठी तसेच करिअरच्या दृष्टीने आज महिला नोकरी, व्यवसाय करत आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महिलांसाठी रेल्वेकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये मात्र वाढ झालेली नाही.

महिला प्रवाशांसाठी आजही लोकलमध्ये केवळ तीन डब्बे आहेत. लोकलचे डब्बे पकडण्यासाठी महिलांना धावाधाव करावी लागते. रेल्वेतील प्रवास सुरक्षित नाही अशा अनेक समस्यांविषयी प्रशासनाचे लक्ष वेधून ही प्रशासन लक्ष देत नसल्याने महिला प्रवाशांनी महिला

दिनी काळ्या फिती लावून प्रवास करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आसनगांव, बदलापूर, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, टिटवाळा, ठाणे रेल्वे स्थानकातील महिलांचा यास जास्त प्रतिसाद लाभला.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय ट्रेनमधील महिलांची वाढत जाणारी गर्दी व प्रवासातील महिलांची असुरक्षितता याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ, तेजस्विनी महिला प्रवासी संघटना आणि महिला प्रवाशांनी बुधवारी महिला दिनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. डोंबिवली स्थानकातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला नोकरदार वर्गाची आणि तिकीट-पास काढून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे.

असे असले तरी रेल्वेने महिलांसाठी अद्यापही डब्बे वाढवलेले नाहीत. काही रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची सोय केलेली दिसत नाही. कधी कधी तर शौचालय चक्क कुलूप बंद अवस्थेत दिसून येतात. अशा वेळी महिलांची फारच कुचंबना होताना दिसते, अशा अनेक समस्या महिला प्रवासी सहन करत आहेत.

यासाठी आज महिला प्रवासी संघटनेतर्फे डोंबिवली रेल्वे स्थानकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काळ्या फिती लावून हे निषेध आंदोलन केल्याचे प्रवासी महिला संघटनेच्या अध्यक्षा लता आरगडे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांना समान संधी व अधिकार देणे याची आठवण करून देण्यासाठी आहे. तसेच लैंगिक समानता आणि महिलांच्या अधिकारांवर केंद्रीत आहे.

पण पुरोगामी महाराष्ट्रातील व भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात ओळख असलेल्या मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांना आजही त्यांच्या समान हक्क व अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांची फार मोठ्या प्रमाणात अवहेलना होऊन तीचा रोजचा प्रवास हा असुरक्षित झालेला आहे.

सहा महिन्यापूर्वी महिलांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी आम्ही डिआरएम साहेबांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. पण त्या निवेदनाची त्यांनी कोणती दखल न घेता, नेहमीप्रमाणे कचऱ्याची पेटी दाखवली, आठ दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आम्ही निवेदन सादर करत आठवण करुन दिली तसेच आंदोलनाची कल्पना दिली.

मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आज महिला दिनी काळ्या फिती लावून निषेध केला आहे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले. महिला प्रवाशांच्या या आंदोलनाकडे आता प्रशासन कसे लक्ष देते पहावे लागेल.

या आहेत मागण्या...

१) उपनगरीय रेल्वेच्या वाढत जाणारी गर्दीचे विभाजन करण्याकरिता कार्यालयीन वेळेत बदल करणे...

२) महिला प्रवाशांकरीता बोगीची संख्या वाढविणे...

३) एसी ट्रेन /फर्स्टक्लास डब्यातील अनधिकृत प्रवासी यांना रोखण्यासाठी सर्व स्टेशनवर टिसीची नेमणूक करणे...

४) सर्व उपनगरीय स्टेशन परिसरातील तसेच ब्रिजवरील अनधिकृतपणे बसणारे फेरीवाले यांना तात्काळ उठवणे..

५) उपनगरीय ट्रेनमधील महिलांच्या डब्यातून विकी करणाऱ्या पुरुष फेरीवाले यांना बंदी घालणे...

६) रेल्वे परिसरात लहान बालकांना भिक मागायला तसेच सामान विक्री करायला लावणाऱ्या पालकांवर कायदेशीर कारवाई करणे....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com