Mumbai Railway : मध्य रेल्वेचा विशेष मेल, एक्सप्रेस गाड्यांची मुदतवाढ !

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०२५ दादर-बलिया त्रि-साप्ताहिक धावणारी विशेष गाडी ३० जून ऐवजी आता २९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Railway
Railwayesakal

Mumbai Railway - रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचा कालावधीत वाढ केली आहे. यामध्ये दादर -धुळे सुपरफास्ट, दादर-बलिया त्रि-साप्ताहिक, तिरुपती-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडयांना मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना गर्दीतून दिलासा मिळणार आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०२५ दादर-बलिया त्रि-साप्ताहिक धावणारी विशेष गाडी ३० जून ऐवजी आता २९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर ट्रेन क्रमांक ०१०२६ बलिया-दादर त्रि-साप्ताहिक विशेष गाडी २ जुलै ऐवजी आता २९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०१०२७ दादर- गोरखपूर आठवड्यातून ४ दिवस २९ जूलै ऐवजी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Railway
Mumbai : तलाठी पदाच्या परिक्षा शुल्काला राज्यात विरोध, राखीव प्रवर्गासाठी ९०० तर खुला प्रवर्गासाठी १००० रूपये

तर ट्रेन क्रमांक ०१०२८ गोरखपूर- दादर आठवड्यातून ४ दिवस ३ जुलै ऐवजी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासोबत ट्रेन क्रमांक ०११३९ नागपूर- मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष १ जुलै ऐवजी ३० सप्टेंबरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. तसेच ट्रेन क्रमांक ०११४० मडगाव- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष २ जुलै ऐवजी १ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Railway
Mumbai : सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच डोळ्यांची ओपीडीप्लास्टिक सर्जरी विभागही सुरू होणार

ट्रेन क्रमांक ०१४३५ सोलापूर-मुंबई साप्ताहिक विशेष ४ जुलै ऐवजी २५ जुलै पर्यंत तर ट्रेन क्रमांक ०१४३६ मुंबई-सोलापूर साप्ताहिक स्पेशल २८ जून ऐवजी २६ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०१४३७ सोलापूर-तिरुपती साप्ताहिक स्पेशल ३० जून ऐवजी २८ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०१४३८ तिरुपती-सोलापूर साप्ताहिक स्पेशल २९ जून ऐवजी २७ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०२१०१ दादर-मनमाड सुपरफास्ट स्पेशल ३० जून ऐवजी ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०२१०२ मनमाड- दादर सुपरफास्ट विशेष ३० जून ऐवजी २९ सप्टेंबरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.

Railway
Pune : लोणी धामणी परिसराला जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला सुद्धा आनंद मिळणार नाही; दिलीप वळसे पाटील

यासोबत ट्रेन क्रमांक ०१०६६ दादर-धुळे सुपरफास्ट स्पेशल १ जुलै ऐवजी २९ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०१०६५ धुळे - दादर सुपरफास्ट विशेष ३० जून ऐवजी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०१४३९ पुणे – अमरावती विशेष २ जुलै ऐवजी ३० जुलैपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे विशेष ३ जुलै ऐवजी ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०१११७ मुंबई- दानापूर विशेष १८ जून ऐवजी २९ जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०१११८ दानापूर-मुंबई विशेष १९ जून ऐवजी ३० जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com