

26/11 Mumbai Terror Attack | Railway Security Lapses After 18 Year
esakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यानंतर रेल्वे स्थानकांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजनांची घोषणा झाली. वेळोवेळी पाहणी, सर्वेक्षण आणि सुरक्षा ऑडिट करण्यात आले. नव्या उपकरणांसाठी कोट्यवधी रुपयांचे प्रस्तावही तयार झाले. मात्र, एवढ्या वर्षांनंतरही सुरक्षा व्यवस्थेचे वास्तव चिंताजनक आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट स्थानकातील एकमेव बॅग स्कॅनर गेल्या १० ते १५ दिवसांपासून बंद असून, त्यासाठी ऑपरेटरही उपलब्ध नाही. नऊ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरपैकी काही बंद आहेत. सीएसएमटी, दादर, ठाणे आणि कल्याणमधील तपासणी व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वेक्षणे आणि अहवालांचा खेळ कधी थांबणार आणि प्रत्यक्ष सुरक्षा कधी सुधारणार, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.