Mumbai Railway Station Cleanliness
esakal
-नितीन बिनेकर
मुंबई : आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कपमुळे (ICC T20 World Cup) विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक मुंबईसह विविध शहरांत दाखल झाले आहेत. मात्र, मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छता (Mumbai Railway Station Cleanliness Controversy) आणि रुळांजवळील अतिक्रमणाचे व्हिडिओ परदेशी पर्यटकांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने भारतीय रेल्वे व्यवस्थेची आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.