
Mumbai Local Train News: मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवे पाऊल उचलले असून, १७ प्रमुख स्थानकांवर एलिव्हेटेड डेक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या डेकमुळे प्रवाशांना अधिक जागा मिळेल तसेच व्यावसायिक सुविधांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.