Mumbai : पॉवर कम ट्रॅफिक ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पॉवर कम ट्रॅफिक ब्लॉकमुळे ५ डिसेंबर
Indian Railways
Indian Railwaysesakal

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वापी आणि उदवाडा स्थानकांदरम्यान पादचारी पुलाच्या गर्डर टाकण्यासासाठी 5 आणि 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.35 ते दुपारी 1.25 तासांपर्यंत पॉवर कम ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतून बाहेर गावी जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम पडणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पॉवर कम ट्रॅफिक ब्लॉकमुळे ५ डिसेंबर २०२२ रोजी ट्रेन क्रमांक 19015 दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस 1 तास 05 मिनिटे विलंबाने धावणार आहे. ट्रेन क्रमांक 12471 वांद्रे टर्मिनस - श्री माता वैष्णो देवी कटरा स्वराज एक्सप्रेस 35 मिनिट, ट्रेन क्रमांक 12926 अमृतसर-मुंबई सेंट्रल पश्चिम एक्सप्रेस 1 तास 40 मिनिट, ट्रेन क्रमांक 16588 बीकानेर-यशवंतपुर एक्सप्रेस 1 तास 25 मिनिटे, ट्रेन क्रमांक 22954 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल गुजरात एक्सप्रेस 1 तास 25 मिनिटे आणि ट्रेन क्रमांक 01102 मडगांव-अहमदाबाद स्पेशल 1 तास 5 मिनिटे विलंबाने धावणार आहे.

ट्रेन क्रमांक 09154 वलसाड-उमरगाम रोड मेमूला उदवाड़ा दरम्यान शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. तर सहा डिसेंबर २०२२ रोजी ट्रेन क्रमांक 19015 दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस 1 तास, ट्रेन क्रमांक 12926 अमृतसर-मुंबई सेंट्रल पश्चिम एक्स्प्रेस 01 तास 45 मिनिटे, ट्रेन क्रमांक 22954 अहमदाबाद-मुंबई मध्य गुजरात एक्सप्रेस 1 तास 35 मिनिटे आणि ट्रेन क्रमांक 19028 जम्मू तवी-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस 1 तास 15 मिनिटे विलंबाने धावणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com