esakal | मुंबई : शीव स्थानकात 'सेल्फी पॉईंट'चे उदघाटन | Sion station
sakal

बोलून बातमी शोधा

Sion Station

मुंबई : शीव स्थानकात 'सेल्फी पॉईंट'चे उदघाटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारावी : मध्य रेल्वेवरील (central railway) शीव स्थानकास (sion station) आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले होते. आता स्थानकाचे रूपडे बदलले आहे. मुंबईतील स्वच्छ व सुंदर स्थानकात शीव स्थानक झळकले आहे. धारावीकडून शीव स्थानकात जाण्यास असलेल्या पादचारी बोगद्याजवळील पडीक जुनी पाण्याची टाकी काढून टाकण्यात आली आहे. मोकळ्या झालेल्या जागेवर सुशोभीकरण (beautification) करण्यात आले आहे. तसेच सेल्फी पॉइंट (selfi point) उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन गुरुवारी (ता. ७) संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले.

हेही वाचा: नवरात्रीनिमित्त दहिसरला लसीकरण

शीव स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या तळमजल्याच्या बुकिंग कार्यालयासमोर असलेले उजाड ठिकाण प्रवाशांसाठी असुरक्षित होते. ते एक सुंदर रंगीबेरंगी सेल्फ पॉइंट झाले आहे. येथे नवीन विकसित केलेल्या गार्डनमध्ये ५० वेगवेगळ्या प्रजातींची रोपटी लावली आहेत.

लायन्स क्लब ऑफ सायनच्या साह्याने स्थानक प्रबंधक गणेश पी स्वैन यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. सामाजिक संस्था-संघटना आणि सोमय्या नर्सिंग कॉलेज यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रमासह उद्घाटन सोहळा अतिथींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, मीना व सायन लायन्स क्लबचे डॉ. अशोक मेहता व सदस्य उपस्थित होते.

loading image
go to top