esakal | नवरात्रीनिमित्त दहिसरला लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

नवरात्रीनिमित्त दहिसरला लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (tejasvee ghosalkar) यांच्या माध्यमातून नवरात्रीच्या निमित्ताने (Navratri festival) तीन दिवस दहिसरमध्ये (dahisar) महालसीकरण मोहीम (corona vaccination drive) चालविण्यात येत आहे. यावेळी बारा हजार नागरिकांचे विनामूल्य लसीकरण (free vaccination) केले जाणार आहे.

हेही वाचा: BMC : कोविड लक्षणे असल्यास तातडीने चाचण्या करा

प्रभागातील एकही व्यक्ती लसीकरणाशिवाय राहू नये, असा संकल्पही या वेळी करण्यात आला. अशा मोहिमा वेळोवेळी राबविल्या जातील, अशी माहिती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी मोहिमेचे उद्घाटन करताना दिली. मुंबई महापालिकेच्या सहकार्याने आणि सुराणा हॉस्पिटलच्या माध्यमातून ही विनामूल्य महालसीकरण मोहीम राबविली जात आहे. बोरिवलीच्या (प.) गणपत पाटील नगराजवळील बॅंक्विट हॅाल येथे रविवारपर्यंत (ता. १०) ही मोहीम सुरू असेल.

loading image
go to top