'या' तारखेपासून पनवेल-गोरेगाव लोकल धावणार | Mumbai Railway update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai train

'या' तारखेपासून पनवेल-गोरेगाव लोकल धावणार

मुंबई : हार्बर रेल्वेच्या (harbor railway) पनवेल स्थानकातून (panvel railway station) गोरेगावला (Goregaon) जाणारी थेट लोकल सेवा (train facility) 1 डिसेंबरपासून (starts from first December) प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे पनवेलवरील प्रवाशांना गोरेगावला जाणारी आणि गोरेगाववरील प्रवाशांना पनवेलला जाणारी लोकल येत आहे, अशी उद्घोषणा ऎकायला मिळणार आहे. या दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांवरील 7 हजार आणि कांदिवली, मालाड येथील 6 हजार प्रवाशांना थेट प्रवाशांचा लाभ होणार आहे.

हेही वाचा: पीएमसी बँक ठेवीदारांना पैसे मिळणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

सध्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते अंधेरी आणि गोरेगाव लोकल सेवा सुरू आहे. याआधी गोरेगावऐवजी सीएसएमटी ते अंधेरीपर्यंतच हार्बर रेल्वेचा मार्ग होता. सीएसएमटीतून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करुन त्यानंतर पश्चिम रेल्वेवरुन गोरेगाव व त्यापुढे प्रवास करत होते. परंतु गोरेगाव ते पनवेल लोकल सुरु करण्याकरिता जोगेश्वरी, गोरेगाव स्थानकाजवळ लोकल उभी करण्यासाठी (सायडिंग) तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळेच गोरेगावपासून पनवेलसाठी लोकल सेवा सुरू होऊ शकत नव्हती. मात्र, ही तांत्रिक कामे दूर करून लोकल सेवा सुरू करण्यास सज्ज केली आहे. तर, डिसेंबर महिन्यात हार्बर रेल्वेचे सुधारित वेळापत्रक जाहिर केले जाणार आहे. या वेळापत्रकात प्रवाशांच्या सोयीसाठी गोरेगाव ते पनवेल थेट लोकल चालविण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीवरील लोकल सेवा अंधेरीपर्यंत धावत होत्या. तर, हार्बर मार्गाचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण करण्याची योजना 2010 साली होती. मात्र, एमआरव्हीसीद्वारे हार्बर मार्गिकेचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण 2014 साली पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले दिले. त्यानंतर प्रकल्प रखडत गेला. तर, अंधेरी ते गोरेगाव 5.2 किमी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करून 2018 साली सीएसएमटीवरून पहिली गोरेगाव लोकल धावली. अंधेरी ते गोरेगाव 5.2 किमीचा एकूण रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

- सध्या पनवेल ते अंधेरी लोकलच्या 9 अप आणि 9 डाऊन अशा 18 फेऱ्या होतात.

- या फेऱ्यांचे 1 डिसेंबरपासून विस्तारीकरण करून पनवेल ते गोरेगाव 18 फेऱ्या धावणार आहेत.

-  सीएसएमटी ते अंधेरी 44 फेऱ्या आणि सीएसएमटी ते वांद्रे दोन फेऱ्यांचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण केले जाणार आहे.

- सध्या सीएसएमटी ते गोरेगाव एकूण 42 फेऱ्या धावत आहेत.

- त्यामुळे डिसेंबरपासून सीएसएमटी/पनवेलवरून गोरेगावसाठी एकूण 106 फेऱ्या धावतील.

loading image
go to top