esakal | मुंबई : रेल्वे रूग्णालयात हायटेक उपकरणे कार्यान्वित | Railway hospital
sakal

बोलून बातमी शोधा

high tech equipment

मुंबई : रेल्वे रूग्णालयात हायटेक उपकरणे कार्यान्वित

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेच्या (central railway) भायखळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे रुग्णालयात (railway hospital) हायटेक उपकरणे (high tech equipment) कार्यान्वित केली. या उपकरणाची तपासणीसाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी गुरुवारी, (ता.14) रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी (Anil kumar lahoti) गेले होते.

हेही वाचा: पेन्शनर्सना दिवाळीपूर्वी थकबाकी; राजीव जलोटा यांचे आश्वासन

महाव्यवस्थापकांनी नेत्रविज्ञान विभागात कॉर्नियल टोपोग्राफी मशीन (पेंटाकॅम) आणि संपर्करहित  टोनोमीटर कार्यान्वित केले. त्यांनी प्रोस्टेटच्या सुरुवातीच्या किमान  शस्त्रक्रियेसाठी एन्डोस्कोपी आणि रेक्टोस्कोपद्वारे ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन सेट देखील कार्यान्वित केले. वंध्यत्व, रजोनिवृत्ती, पॉलीप्स, फायब्रॉईड्स आणि गर्भाशयाच्या पूर्व-कर्करोगाच्या उपचारांसाठी सुरुवातीच्या किमान शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग विभागात वापरले जाते.

लाहोटी यांनी नुकत्याच सुरू झालेल्या हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (एचएमआयएस) च्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध ओपीडी, वॉर्ड, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, कॅज्युअल्टी आणि फिजिओथेरपी विभागांना भेट दिली. त्यांनी अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व कामांची पाहणी केली आणि प्रगतीला गती देण्यासाठी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.वाय.एस. अटारिया, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक एस के पंकज, प्रधान मुख्य अभियंता अश्वनी सक्सेना, प्रधान मुख्य विद्युत अभियंता गोपाल चंद्र, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल, वैद्यकीय संचालक/भायखळा डॉ. मीरा अरोरा आणि मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top