
मुंबईत यंदा मान्सूनने दमदार सुरुवात केली आहे. गेल्या सात दशकांतील सर्वात लवकर आगमन करणाऱ्या या मान्सूनने शहराला भिजवले असून, आजही (27 मे) मुसळधार पावसाचा रेड अलर्ट भारतीय हवामान खात्याने (IMD) जारी केला आहे. सकाळी हलक्या सरींनी सुरुवात झाली असली, तरी दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच, आज सकाळी 11:24 वाजता 4.75 मीटर उंचीची भरती येणार असल्याने खालच्या भागात पाणी साचण्याचा धोका आहे.