
मुंबई : पावसाने रविवार रात्रीपासून मुंबई आणि परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच राहिल्याने उपनगरीय रेल्वेचा वेग काहीसा मंदवाला होता. यामुळे सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. तर दुपारपासून ठाणे-कल्याण भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.