
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्य सरकारनं गुरुवारी (२० जुलै) रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर याच दिवशी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. तसेच या परीक्षांचं सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. (Mumbai Rain Maharashtra education Board 10th 12th exams postponed Revised schedule will be announced soon)
मुंबईसह कोकण आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु असल्यानं राज्य सरकारकडून गुरुवारी, 20 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं मंडळाच्या दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या द्वितीय भाषा या एनएसक्यूएफ मधील हिंदी आणि समाजशास्त्र या विषयातील परीक्षा असून या परीक्षेला राज्यभरातून केवळ 41 विद्यार्थी बसणार होते. तर दुसरीकडे बारावीच्या द्वितीय भाषा या विषयातील मराठी उर्दू हिंदी आधी विषयाची परीक्षा असून या परीक्षेला राज्यभरातून ८ हजाराहून अधिक विद्यार्थी बसणार होते. (Marathi Tajya Batmya)
राज्यातील एकूण अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दैनिक 'सकाळ'शी बोलताना दिली. दरम्यान, बुधवारी, 19 जुलै रोजी मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विविध प्रकारच्या नऊ विषयातील परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत.
दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक परिषद तसेच महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आदी संघटनांनी केली होती.
दहावीचे जे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत ते आता 2 ऑगस्ट २०२३ रोजी होतील. तर बारावीचे पुढे ढकललेले पेपर ११ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडतील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिवांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.