
Rain Update
ESakal
बदलापूर : मॉन्सून परतला असताना आज अचानक बदलापुरात आभाळ फाटले. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या तासाभरात १०१.८ मिमी पावसाची नोंद झाली. ऐन दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या, कमानी, झाडे पडल्याच्या घटना घडल्याने, सायंकाळी शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि त्यामुळे बदलापूरकरांना दिवाळी अंधारातच साजरी करण्याची वेळ आली.