Sat, Sept 30, 2023

मुंबईत येत्या तीन-चार तासांत जोरदार पावसाचा अंदाज - IMD
Published on : 31 August 2022, 2:13 pm
मुंबई : शहरात येत्या तीन-चार तासांत वादळ तसेच विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील काही भागांत 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे येण्याची शक्यता आहे. तसेच शहर आणि काही परिसरात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी घराबाबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील IMD मुंबईच्या वतीने करण्यात आहे.