esakal | मुंबईत पावसाचा जोर वाढला, सायनमध्ये साचलं पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Rain

मुंबईत पावसाचा जोर वाढला, सायनमध्ये साचलं पाणी

sakal_logo
By
सुमित सावंत

मुंबई: मागच्या आठवड्यापासून पावसाने मुंबईत जोर पकडला (Mumbai heavy rain) आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पावसाने मुंबईला झोडपून काढले. शनिवारी रात्री पाऊस तर काळरात्र बननू कोसळला. संरक्षक भिंत कोसळणं (protection wall incident) आणि अन्य दुर्घटनांमध्ये ३० पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे अनेक सखल भागात पाणी साचले (water logging) होते. काल आषाढी एकादशीच्या दिवशी मुंबईत ढगाळ वातावरण (cloudy atmosphere) होते. पण पावसाने विश्रांती घेतली होती. (Mumbai rain update train & road way tillnow working fine dmp82)

आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अजूनतरी कुठे रस्ते किंवा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त नाहीय. सध्या मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण सायनमध्ये गुरुकृपा हॉटेल परिसर, साधना विद्यालय भागात पाणी साचलं आहे.

आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अजूनतरी कुठे रस्ते किंवा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त नाहीय. सध्या मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास हिंदमात, अंधेरी सब वे या सखल भागात पाणी साचू शकते.

हेही वाचा: Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

आज सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांनी भरतीची वेळ होती. ४. १२ मीटर उंचीच्या लाटा मुंबईला धडकल्या. त्यानंतर रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी भरतीची वेळ असणार आहे. त्यावेळी ३. ६३ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तसेच हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

सीएसएमटी भागात मागील दोन तासात 40.89 मिमी पाऊस

माटुंगा भागात मागील दोन तासात 33.04 मिमी पाऊस

विक्रोळी भागात मागील दोन तासात 39.87 मिमी पाऊस

loading image