esakal | मुंबई पाऊसः उद्यापासून कसा असेल पावसाचा जोर, वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पाऊसः उद्यापासून कसा असेल पावसाचा जोर, वाचा सविस्तर

गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस सक्रीय आहे. आता या पावसाचा जोर पुढचे तीन दिवस देखील असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई पाऊसः उद्यापासून कसा असेल पावसाचा जोर, वाचा सविस्तर

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस सक्रीय आहे. आता या पावसाचा जोर पुढचे तीन दिवस देखील असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये जोरदार बँटिग सुरू केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा  जोर कायम आहे. 

आज मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच उद्यापासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. १ जून ते १४ ऑगस्ट दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझ वेधशाळेनुसार, २६४५.२ मिमी पाऊस झाल्याची नोंद केली आहे. जो १००८.८ मिमी पेक्षा जास्त आहे. याचदरम्यान कुलाबा वेधशाळेनुसार १,००९ मिमी जास्त पाऊस पडला.

नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रीय आहे. यामुळे येत्या आठवड्यातही पाऊस राज्यात सक्रिय असेल असा अंदाज आहे. बुधवारपर्यंत कोकण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची होणार असून मुंबईत, रायगड आणि पुण्यात मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचाः  काळजी घ्या, गेल्या अडीच महिन्यात मुंबईत कोरोनानं घेतले 'इतके' बळी

मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात तुरळक ठिकाणी आज अती तीव्र मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भ, कोकण भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस कोसळू शकतो. मंगळवारी कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर तुरळक ठिकाणी कायम राहील. तर विदर्भात मात्र तो थोडा कमी होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचाः  मुंबईतल्या २० वॉर्डमध्ये कशी आहे कोरोनाची स्थिती, जाणून घ्या

रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट भागांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगडमध्ये बुधवारी पावसाचा जोर किंचित कमी होईल, अशी शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथेही मंगळवारी आणि बुधवारी मध्यम स्वरूपाच्या तर गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. तसंच पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्यांच्यासाठी NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या.

Mumbai Rain update yellow alert till tuesday palghar thane heavy rainfall