esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर ओसरला

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर ओसरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गुलाब वाढळच्या प्रभावाने मुंबईत पावसाने जोर पकडला होता. गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला झोडपून काढले होते. आज मात्र पावसाचा जोर ओसरला असून दुपारनंतर हलकं ऊन देखील पडलं होतं.

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत पावसाचे पुनरागमन झाले होते. तीन दिवस मुंबईत काही भागात मुसळधार तर काही भागात अतिमूसळधार पाऊस पडला. तीन दिवस बरसल्यानंतर आज सकाळी जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला. तर दुपारनंतर हलकं ऊन पडल्याचे दिसले.

हेही वाचा: इंदापूर नगरपरिषदेमार्फत कचरा अलग करो अमृतमहोत्सव : अंकिता शहा

मुंबईत गेल्या 24 तासात 92.12 मिमी पावसाची नोंद झाली. शहर 82.26,पूर्व उपनगर 103.52 तर पश्चिम उपनगर 90.59 मिमी पावसाची नोंद झाली. आज देखील मुंबईत मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यादरम्यान प्रतितास 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गुलाब चक्रीवादळा चे कमी दाबाच्या क्षेत्राच्या अवशेष सध्या द गुजरात व खंबातचे आखात वर आहे. उद्या (ता.30) सकाळ पर्यंत ते उत्तर पूर्व अरबी समुद्रात पोहोचणार असून अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ते पुढे पश्चिम- उत्तर/पश्चिम दिशेनं सरकून त्याच्या पुढच्या 24 तासात त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे ते भारतीय किनारपट्टी पासून दूर जात पाकिस्तान- मकरान किनारपट्टी कडे जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

loading image
go to top