

Mumbai Monsoon
esakal
मुंबई: शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर दिसला. काही भागांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या असल्या, तरी मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल, बेस्ट बस आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू होती. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांना फारसा मनस्ताप सहन करावा लागला नाही.