मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर लोकल वाहतूक सुरु

CSMT ते कुर्ला, ठाणे, वाशी मार्गावर रेल्वेसेवा ठप्प होती.
मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर लोकल वाहतूक सुरु
  • CSMT ते कुर्ला, ठाणे, वाशी मार्गावर रेल्वेसेवा ठप्प; मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाची माहिती

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात पहिल्याच पावसाने जोरदार बॅटिंग केली. सलग पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे सेवा कोलमडली. सीएसएमटी-ठाणे, गोरेगाव-सीएसएमटी, वाशी-सीएसएमटी दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली होती. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर पाणी साचले होते. लगेच तेथे पंप सुरू करून पाणी उपसण्यात आले. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू होती.

दरम्यान आता मध्य रेल्वेच्या सीएसएमटी/कल्याण आणि सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरु झाली आहे. सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावरील लोकल सेवा 8.40 मिनिटांनी सुरू करण्यात आली. हार्बर मार्गावरील वडाळा-मानखुर्द बद्दल कळवण्यात येईल.

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली. बुधवारी, (ता. 9) रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रेल्वे वाहतूकीला मोठा फटका बसला. सकाळीपासून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. रेल्वे रूळावर पाणी साचल्याने लोकल सेवा धिम्या गतीने सुरू होती. तर, सायन-कुर्ला दरम्यान रेल्वे रूळाच्या धोकादायक पातळीपर्यंत पाणी साचल्याने लोकल सेवा थांबली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानची सेवा सकाळी 9.50 वाजता बंद केली. पावसाचा वेग कायम राहिल्याने पाणी साचण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, सकाळी 10.20 वाजता सीएसएमटी-ठाणे, सीएसएमटी-वाशी, सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव आणि सकाळी 11.10 वाजता सीएसएमटी-मानखुर्द लोकल सेवा बंद करण्यात आली. ठाणे ते कल्याण दिशेकडील, वाशी ते पनवेल, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावत होत्या.(Mumbai Rains Heavy Rainfall affects Local Trains Bus services water logging some trains cancelled visibility issue on road transport)

सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव सकाळी 11.30 वाजता सुरू करण्यात आली होती. तर, 12 वाजेच्या सुमारास वाशीएवजी मानखुर्द-पनवेल सेवा सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर दुपारी 4 वाजता वडाळा ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा रद्द केली होती. दुपारी 4.10 वाजता सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव दरम्यानची लोकल सेवा वडाळा ते किंग्ज् सर्कल दरम्यान पाणी साचल्याने बंद करण्यात आली होती. तर, सीएसएमटी-मानखुर्द लोकल सेवा देखील बंद करण्यात आली होती.

मध्य रेल्वे मार्गावरील अनेक लोकल रद्द झाल्याने आणि उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकात गर्दी झाली होती. सकाळच्या सुमारास सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. लोकल सेवा ठप्प झाल्याने बस, टॅक्सी, रिक्षा व इतर पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी पोहचले. तर, काही प्रवासी लोकल सुरू होईल, या अपेक्षेणे लोकलमध्ये, स्थानकात थांबून राहिले.

स्थानकात लोकल रद्द केल्याच्या उद्घोषणेने गोंधळ

लोकल सेवा रद्द झाल्याची उद्घोषणा एकून प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. पाण्यात अडकलेल्या लोकल गाड्यांमधून खाली उतरुन पाण्यातून वाट काढत प्रवाशांनी जवळचा रस्ता गाठण्याचा प्रयत्न केला.पहिलाच पावसात रेल्वे वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहण्यासाठी लेट मार्क लागलेला आहे.

मेट्रो सेवा सुरळीत

मुसळधार पहिल्या पावसामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो 1 ची सेवा सुरळीत सुरू होती. सकाळी आणि दुपारी नेहमीप्रमाणे 60 ते 70 फेऱ्या धावल्याची माहिती मेट्रो प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com