esakal | पालघरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; जाणून घ्या निर्माण झालेली स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

पालघरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; जाणून घ्या निर्माण झालेली स्थिती

sakal_logo
By
अच्युत पाटील

बोर्डी अस्वाली खाडीला पूर; शेताचे बांध फुटून भातशेतीचे नुकसान

बोर्डी: पालघर जिल्ह्याच्या पश्‍चिम किनारपट्टीला रविवारी पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे हाहाकार माजला. सर्वत्र पाणी भरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. डहाणू बोर्डी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. डहाणू येथील कंक्राडी खाडीला पूर आल्यामुळे डहाणू रेल्वे स्थानक परिसरातील इराणी रोड व नगरपालिका रोडवर पाणी भरले तर बोर्डी अस्वाली खाडीला पूर आल्यामुळे गुजरातकडे जाणारी बोर झाई मार्गावरील वाहतूक बंद पडली. (Mumbai Rains Palghar Heavy Rainfall Update Cloud blast Flood destroyed Farms Creeks Overflow)

हेही वाचा: मुंबई-अहमदाबाद महामार्ग, पांढरतारा पूल गेला पाण्याखाली

बोईसर, बेटेगाव, सरावली हा परिसर जलमय झाला. तारापूरऔद्योगिक वसाहतीतून मुंबई अहमदाबाद महामार्गकडे जाणारा मार्ग पाण्याने अजूनही भरला आहे. पालघर येथे सखल भागांमध्ये पाणी भरल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर केळवे रोड परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तास तुफान पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, तर सूर्य आणि वैतरणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे वाहनांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहेत.

rain

rain

हेही वाचा: चेंबूर दुर्घटना: "पालिकेने सर्वेनंतर नोटीस पाठवलीच नाही"

पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे शेताचे बांध फुटून भात शेतीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे बऱ्याचशा भागात घरांचे नुकसान झाले आहे. मात्र जीवितहानी किंवा वित्तहानीबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान प्रशासकीय यंत्रणा सज्ज असली तरी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे बंदरात नांगरून ठेवलेल्या नौका सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छिमारांना मोठी कसरत करावी लागली होती. दरम्यान सकाळी थोडावेळ पावसाने विश्रांती घेतली. काही वेळ चक्क ऊन पडले. पण त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली.

(संपादन- विराज भागवत)

loading image