राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर माहीम पोलीस अ‍ॅक्शन मोडवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

गुढीपाडवा मेळावा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात घेतलेल्या सभेत माहीममधील समुद्रात अवैध दर्गा बनवल्याचा मुद्दा उपस्थित केला.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर माहीम पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई - गुढीपाडवा मेळावा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात घेतलेल्या सभेत माहीममधील समुद्रात अवैध दर्गा बनवल्याचा मुद्दा उपस्थित केला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अल्टिमेटम देत महिनाभरात अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर स्थानिक माहीम पोलीस अ‍ॅक्शन मोड मध्ये आले आहेत.

माहीम पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी या भागात सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात पोलीस बॅरिकेटिंग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात येणार आहे. तसेच मगदूम शहा बाबा दर्गाजवळ सुद्धा सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.