Ranichi Baug : राणीच्या बागेत पर्यटकांसाठी मगर आणि सुसर बच्चे कंपनीसाठी ठरले आकर्षण

गेल्या काही वर्षांपासून या उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नवनवीन प्राण्यांचा समावेश होत आहे. त्यामुळे नवे प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
Ranichi-Baug
Ranichi-Baugsakal
Summary

गेल्या काही वर्षांपासून या उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नवनवीन प्राण्यांचा समावेश होत आहे. त्यामुळे नवे प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

मुंबई - शाळांना सुट्या असल्याने पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला दररोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पर्यटक आणि मुलांसाठी उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’ (मगर आणि सुसर साठीचे मोठे तळे) पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पर्यटकांना विशेषता बच्चे कंपनीसाठी हे आकर्षण ठरले आहे. गेल्या शनिवारी आणि रविवारी तब्बल ३३ ते ३५ हजार पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली.

गेल्या काही वर्षांपासून या उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नवनवीन प्राण्यांचा समावेश होत आहे. त्यामुळे नवे प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. उन्हाळ्यात मुंबईसह इतर राज्यातून तसेच परदेशातील पर्यटकही भेट देत आहेत.

सध्या उद्यानात वाघ, बिबट्या, पेंग्विन, अस्वल हे प्राणीदेखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. त्यातच काल रविवार(ता. ७) पासून उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’मध्ये तीन मगर आणि दोन सुसर सोडण्यात आले आहेत.

प्रशासनाने या तळ्यात मगरींसाठी आणि सुसरसाठी दोन वेगवेगळे भाग तयार केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाचवेळी दोन्ही प्राणी पाहण्याचा आनंद घेता येत आहे. तसेच पाण्यात पहुडलेल्या मगर आणि सुसर पर्यटक तळयाकाठी बनविलेल्या ‘डेक’वरूनही पाहू शकतात. तसेच या प्राण्यांच्या पाण्याखालील हालचालीदेखील पर्यटक टीपू शकतात.

पाणपक्ष्यांचा पिंजरा ठरतोय आकर्षण

प्राणिसंग्रहालयात आणखी एक खास आकर्षण म्हणजे पाणपक्ष्यांसाठीचा पिंजरा. या पिंजऱयात पर्यटकांना स्वत: आत जाता येते. पिंजऱयात गेल्यावर आपल्या चोहीबाजूला पक्षी नजरेस पडतात. त्यामुळे आपण पक्ष्यांच्याच घरट्यात शिरल्याची अनुभूती पर्यटक घेवू शकतात.

अंडर वॉटर व डेक व्ह्युविंग गॅलरी

प्राणी संग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्युविंग गॅलरी’प्रमाणे दर्शनी भाग बनवण्यात आला आहे. मगरीसाठी १५०० चौरस मीटर जागा अंदाजित करून ही गॅलरी बनवण्यात आली आहे. यामध्ये जाऊन पर्यटक ‘अंडर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्युविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहण्याचा आनंद घेता येतो.

35 हजार पर्यटकांची भेट

गेल्या शनिवारी आणि रविवारी तब्बल ३३ ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. उद्यानास भेट देतात. सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज २० ते २२ हजार पर्यटक भेट देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com