esakal | Corona Virus vaccine: लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, व्हॅक्सिन कुठे स्टोर करणार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus vaccine: लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, व्हॅक्सिन कुठे स्टोर करणार

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी शनिवारी मुंबईत लस उपलब्ध झाल्यानंतर त्या कुठे कुठे स्टोरेज करून ठेवल्या जातील या संदर्भातला आढावा घेतला.

Corona Virus vaccine: लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, व्हॅक्सिन कुठे स्टोर करणार

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी शनिवारी मुंबईत लस उपलब्ध झाल्यानंतर त्या कुठे कुठे स्टोरेज करून ठेवल्या जातील या संदर्भातला आढावा घेतला. कांजूरमार्ग येथील पालिकेच्या इमारतीत देखील स्टोरेजची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

मुंबईत व्हॅक्सिन कुठे स्टोर करणार 

  • सायन, केईएम, नायर, कूपर रुग्णालय आणि एफ साऊथ ऑफिस यासह कांजूरमार्ग येथे स्टोरेज.
  • 10 लाख लस स्टोअर करण्याची क्षमता आहे.
  • तापमान -25 ते -15 डिग्री तापमानची सुविधा.
  • कांजूरमार्ग येथे मुबलक स्टोरेज होऊ शकते. 
  • 50 लाखांहून अधिक लस स्टोअर करु शकतो.
  • लस आल्यास 24 तासात आपण पहिल्या टप्प्यातील लोकांना लस देऊ शकतो.
  • राजवडीत 2 सेंटरमध्ये काम करणार.
  • 8 सेंटर तयार आहेत आणि 8 सेंटर उद्यापर्यंत तयार होतील. 16 सेंटर आपले तयार होणार आहेत.
  • मुंबईत 50 सेंटरचे नियोजन, 2 शिफ़्टमध्ये काम करणार.

बेड आणि स्टाफ 

मुंबईत कोविड सेंटरचे 75 टक्के बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन सिस्टम देखील सज्ज आहे. रुग्ण वाढले तरी मुंबई सज्ज आहे.. आपल्याकडे मुबलक स्टाफ उपलब्ध असल्याचं काकाणी यांनी सांगितलं. युके येथून नवा कोरोनाचा रुग्ण आला तरी त्यासाठी देखील पालिकेची तयारी असल्याचंही ते म्हणालेत. 7 हजार आता रुग्ण आहेत. बेड रिकामे असले तरी आपण स्टाफला कायम ठेवलं आहे कारण आपल्याला त्यांची केव्हाही गरज पडू शकते, असं काकाणी यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा- मुंबईत पावसाळी आजारामुळे मृत्यूचा आकडा घटला

आठ लसीकरण केंद्रासह साठवणुक केंद्राची तयारी पूर्ण झाली आहे. ही लस 2 ते 8 अंश तापमानाला साठवावी लागणार आहे. तसेच, वाहतुकही याच तापमानाला करावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आवश्‍यकता भासल्यास उणे 25 ते 15 अंश तापमानातही लस साठविण्याची तयारी महापालिकेने केली आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

आरोग्य कर्मचाऱ्यांपासून सुरुवात

पहिल्या टप्प्यात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.अशा 1 लाख 25 हजार कर्मचाऱ्यांची नोंद महानगर पालिकेने केली आहे. दुसऱ्या टप्प्या पासून लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. यात निम वैद्यकिय कर्मचारी, कोविड संदभार्गत काम केलेले पालिकेचे आणि खासगी सफाई कामगार, इतर फ्रंट लाईन कर्मचारी, पोलिस, बेस्ट आणि राज्य परिवहन सेवेचे कर्मचारी असे 5 ते 6 लाख जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरिक आणि सहाव्याधी आणि दिर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Mumbai ready for vaccination where  store the vaccine bmc suresh kakani