पतीकडून पत्नी आणि सासरच्या नातेवाइकांवर गुन्ह्याची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Crime News : पतीकडून पत्नी आणि सासरच्या नातेवाइकांवर गुन्ह्याची नोंद

मुंबई - मुंबईत एका 37 वर्षीय पतीने स्वतःच्या पत्नी आणि सासरच्या नातेवाइकांवर गंभीर आरोप करत कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत फिर्यादीने तक्रारीत त्याच्या पत्नीने त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप डेटा काढला. या डाटामध्ये लग्नापूर्वी त्याच्या माजी प्रेयसीसोबतचे संभाषण आणि अनेक खाजगी फोटो होते. पत्नीने हे फोटो तिच्या माहेरच्या मंडळींना पाठवले. आता पत्नीच्या माहेरकडील दोघानी पिडीत पतीच्या राहत्या सोसायटीबाहेर फोटोंचे पोस्टर लावून समाजात बदनामी करण्याची धमकी देत ​असल्याचा आरोप पिडीत पतीने केला आहे.

पीडित पतीच्या तक्रारीवरून, कस्तुरबा मार्ग पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आणि त्याची पत्नी तसेच सासरच्या विरोधात भादंवि कलम 500, 506 आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला.या वर्षी जानेवारीत त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत चालले होते, मात्र काही दिवसांतच छोट्या-छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. तपासादरम्यान, बोरिवली पूर्वेतील कार्टर क्रॉसरोड क्रमांक 3 येथे पीडिता आई-वडील आणि पत्नीसोबत राहत असल्याचे समोर आले. पीडित महिला एका नामांकित कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत आहे, तर त्याची पत्नी आयुर्विमा कंपनीत व्यवस्थापक आहे.