मुंबईतील रूग्णवाढ थांबेना! आज 11,317 कोरोना बाधितांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient

मुंबईतील रूग्णवाढ थांबेना! आज 11,317 कोरोना बाधितांची नोंद

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मुंबईतील कोरोना (Mumbai Covid 19 Update) रूग्णांची वाढ काही केल्या कमी होताना दिसत नसून, आज मुंबईमध्ये 11,317 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर आज 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Covid Death In Mumbai) झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai Latest Corona Updates In Marathi )

आज नव्याने नोंदविण्यात आलेल्या रूग्णांपैकी 9,506 म्हणजेच 84 टक्के रूग्णांमध्ये कोणतीही (Covid Symptoms ) लक्षणे आढळून आलेली नसून आज 800 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 88 रूग्ण ऑक्सिजन (Oxygen Support) सपोर्टवर आहेत. तर आज 22,073 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आज 54, 924 कोरोनाच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी, 11,317 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज मृत्यू झालेल्या रूग्णांपैकी सात जणांना दीर्घकालीन आजार होते.

हेही वाचा: SA vs IND, 3rd Test: 30 वर्षे, 7 कर्णधार... पण पुन्हा आफ्रिकेत मात

दरम्यान, मुंबईतील रूग्ण बरे होण्याचा दर 89 (Mumbai Positive Rate ) टक्क्यांवर गेला असून रूग्णवाढीचा दर 1.74 इतका नोंदविण्यात आला असून, रूग्ण दुप्पटीचा दर 39 दिवसांवर नोंदविण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये 65 इमारती सील करण्यात आल्या आहेत. (Total Building Sealed In Mumabi Due To Covid)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsCoronavirus
loading image
go to top