मुंबईतील रूग्णसंख्या पुन्हा 20 हजार पार; सहा जणांचा मृत्यू

वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज नव्याने निर्णय जाहीर केले जाऊ शकतात.
Corona
CoronaANI

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून यामुळे, प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत २० हजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर सहा जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू (Corona Cases In Mumbai) झाला आहे. तर 8 हजार 490 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी राजधानी मुंबईत 20, 181 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती, तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death In Mumbai ) झाला होता. दरम्यान, राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज नव्याने निर्बंध जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Mumbai Records 20, 971 New Corona Cases On Friday)

सध्या मुंबईत 91 हजार 731 सक्रीय रुग्ण असून, (Active Corona Cases In Mumbai) मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 53 वर पोहोचली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 हजार 394 इतकी झाली आहे. (Corona Death In Mumbai) मुंबईत कोरोना संसर्गाचा वेग सातत्याने वाढत असून, गेल्या 24 तासात शहरात 20971 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या आकडेवारीपेक्षा हा आकडा 800 ने अधिक आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, आढळलेल्या नवीन रुग्णांपैकी 17, 616 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. शहरात सध्या 6 कंटेन्मेंट झोन असून 123 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Corona
पुणे मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते? मेट्रोची ताशी 90KM वेगाची चाचणी यशस्वी

ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO

सध्या जगभरात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील पॉझिटिव्ह रेट (India Positivity Rate) वाढला असून ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉन हा सौम्य आहे, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, ओमिक्रॉनला सौम्य म्हणणं धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे.

Weekend Lockdown सर्वांना परवडण्यासारखा - पेडणेकर

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोनासाठी बेड्स वाढवणार असल्याची घोषणा केली. लक्षणं असलेले आणि सौम्य लक्षणं असलेल्या सर्वांना बेड्स पुरवण्याची सोय मनपा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं ऑक्सिजनचे बेड्स जवळपास १९ हजार असणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. आयसीयू बेड्स सात हजार एकूण २२ हजार खाटांची सोय करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. (Kishori Pednekar Statement On Mumbai Lockdown). मुंबईकरांनी घाबरण्यापेक्षा या सगळ्याचा सामना करणं आवश्यक आहे असं पेडणेकर यांनी सांगितलं. (Mumbai Mayor on Corona) ओमिक्रॉनबद्दल गंभीरता बाळगणं आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी खबरदारी घेणं आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com