Mumbai : पंधरा अनधिकृत बांधकामांची रेरा नोंदणी महारेरा कडून रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rera Act

Mumbai : पंधरा अनधिकृत बांधकामांची रेरा नोंदणी महारेरा कडून रद्द

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका आणि महारेरा फसवणूक प्रकरणी 65 जणांविरोधात केडीएमसीने गुन्हे दाखल केले आहेत. विशेष तपास पथकाकडून हा तपास सुरु असून याप्रकरणी आत्तापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप असलेल्या 52 विकासकांची नोंदणी रेराने निलंबित केली होती. यातील 15 बांधकामांची रेरा नोंदणी कायदेशीर प्रक्रियेने रद्द करण्यात आली असल्याचे आदेशान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवलीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे रेराची नोंदणी करणाऱ्या व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 65 विकासकांविरोधात रामनगर व मानपाडा पोलिस ठाण्यात केडीएमसीच्या नगररचना विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा विशेष तपास पथकाकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी 4 विकासकांसह 6 एजंटला तपास पथकाने आत्तापर्यंत अटक केली आहे. बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप असलेल्या 52 विकासकाची नोंदणी महारेराने यापूर्वीच निलंबित केली होती.

त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावत इमारत बांधकामाची कागदपत्र, रेरा नोंदणी प्रमाणपत्र दाखल करण्यास सांगितले होते. या प्रक्रीयेसाठी विकासकांना काही दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत एकही विकासक किंवा त्यांचे प्रतिनिधी महारेरा प्राधिकरणासमोर चौकशीसाठी हजर झाले नाही. यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचे अध्यक्ष अजोय मेहता, सदस्य महेश पाठक यांनी 21 नोव्हेंबरला एका आदेशान्वये 15 इमारतींची रेरा नोंदणी रद्द केली असल्याचे जाहीर केले आहे.

या प्रकल्पांची नोंदणी रद्द

आदित्य इन्फ्रा - शिव दत्ता कृपा

डिलक्स होम बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स - डिलक्स होम बिल्डिंग नं. 2

स्पर्शिका बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स - अजिंक्य नारकर

श्री गुरुकृपा कन्स्ट्रक्शन - शिव साई रेसिडेन्सी

धनश्री बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स - सुशीला टॉवर

श्री बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स - श्री बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स

एमएस रुद्रा इन्फ्रा (अमोल कडुसकर) - रुद्रा इन्फ्रा

ओम लिलाई बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स - ओम लिलाई बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स

दुर्गा कन्स्ट्रक्शन - दुर्गा कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स

गांवदेवी इंटरप्रायझेस - गांवदेवी इंटरप्रायझेस

साईश इन्फ्रा - साईश इनक्लेव्ह

आदित्य इन्फ्रा - शीव दृष्टी

श्री क्रीष्णा इन्फ्रा - श्री क्रिष्णा इन्फ्रा

मातोश्री डेव्हलपर्स - मातोश्री डेव्हलपर्स

आदित्य बिल्डकॉन - शीव आराधना कॉम्प्लेक्स