Mumbai TaxiESakal
मुंबई
Mumbai News: चालकांची मनमानी, पाचवर्षे उलटूनही टॅक्सीवर दिवा लागेना; मुंबईकरांचा प्रशासनाला सवाल
Mumbai Taxi: प्रवासात टॅक्सी चालक अनेकदा भाडे नाकारतात. यावर उपाय म्हणून टॅक्सीवर दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला असूनही अद्याप दिवा लागलेला नाही. याबाबत मुंबईकरांनी प्रशासनाला प्रश्न केला आहे.
मुंबई : मुंबईकरांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर या प्रवासात टॅक्सी चालक अनेकदा भाडे नाकारतात. यावर उपाय म्हणून टॅक्सीवर हिरवा, लाल, पांढरा असे तीन दिवे लावण्याचा निर्णय १ फेब्रुवारी २०२० घेण्यात आला. मात्र एमएमआरटीए (मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) बैठकीत त्याला सातत्याने मुदतवाढ मिळाली. साडे पाच वर्ष उलटले तरी अद्याप दिवा लागलेला नाही.