मुंबईत रेस्टॉरंट्स सुरू; पण मद्यविक्रीसाठी वेळ काय?

मुंबईत रेस्टॉरंट्स सुरू; पण मद्यविक्रीसाठी वेळ काय?

मुंबईः  सहा ते सात महिन्यांच्या ब्रेकनंतर ५ ऑक्टोबरपासून मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार सुरु झाले आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच मुंबईत देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशातच राज्य सरकारनं मिशन बिगन अंतर्गत अनलॉक ५.० मध्ये राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.  राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्यानं सर्व गोष्टी उघडण्याच्या योजनेचा भाग म्हणून काही क्षेत्रातील निर्बंध कमी करण्यात आलेत.

५० टक्क्यांच्या  क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार यांना सोमवारपासून सुरु करण्याची परवानगी आहे. मात्र सोमवारपासून रेस्टॉरंट्स सुरू झाले असले तरी राज्यातल्या रेस्टॉरंट्स मालकांना मद्यविक्री करण्याची परवानगी आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. 

मद्यविक्रीवरील प्रश्नाला उत्तर देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी असे सांगितले की, बारच्या वेळेवर त्यांचा कोणताही अधिकार नाही आणि हा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) चा विषय आहे.

वेळ निश्चित करण्याचा निर्णय एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील प्रचलित कोविड-१९ शर्तीच्या आधारे प्राधिकरणाच्या सशक्त अधिकाऱ्यानं घेतला असल्याचं वरिष्ठ उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सांगितलं आहे.  वेळेवर राज्य उत्पादन शुल्क नोडबाबत बार मालकांच्या गोंधळाबद्दल विचारले असता ते म्हणाले की,  त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

आपत्ती व्यवस्थापनातील प्रत्येक अधिकाऱ्यानं ठरविलेल्या वेळेनुसार बार उघडू आणि कार्य करू शकतात, असं स्पष्टीकरण आम्ही जारी केले आहे. तसंच हा संपूर्ण अधिकार मुंबईतल्या पालिकेवर असेल आणि इतर ठिकाणी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे असेल, असंही ते म्हणालेत.

या व्यतिरिक्त, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव वलसा नायर सिंह यांनी एफपीजेला सांगितले की, सर्व रेस्टॉरंट्स आणि बारसाठी जवळपास १० वाजताची वेळ आहे. बारसह सर्व रेस्टॉरंट्ससाठीची वेळ सकाळी ८ ते रात्री १० अशी असल्याचं त्या म्हणाल्यात. अशा प्रकारे, विशिष्ट क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रत्येक सशक्त अधिकाऱ्यानं ठरवलेल्या वेळेनुसार बार उघडता आणि चालू ठेवता येणं शक्य असणार आहे.

Mumbai restaurants owner confused allowed sell liquor or not

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com