esakal | हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची लपवालपवी, बाळासाहेब थोरात यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची लपवालपवी, बाळासाहेब थोरात यांचा आरोप

योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद असून हे प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची लपवालपवी, बाळासाहेब थोरात यांचा आरोप

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबईः हाथरस बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पहिल्यापासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. यात योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद असून हे प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हांच्या ठिकाणी झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रकरणावरून सर्वांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवण्याचा डाव असल्याचे हास्यास्पद विधान आदित्यनाथ यांनी केल्याचेही थोरात म्हणाले. 

हेही वाचाः  FDA निर्देश, रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार होऊ न देण्याचे आवाहन

मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. 

अधिक वाचाः  तब्बल 1300 महिलांच्या तक्रारी, लॉकडाऊनच्या काळ्या पडद्याआड घरगुती हिंसाचार

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशातील घटना अमानवीय असून  योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून हा सत्याग्रह आहे.  हाथरसचे प्रकरण दडपण्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते आणि माजी आमदार आरोपींच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत. पोलिस बळाचा वापर करुन पीडित कुटुंबाला समाजापासून वेगळे पाडण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी हे प्रकरण अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. आताही त्यांनी विरोधकांना दंगली घडवायच्या आहेत असा हास्यास्पद आरोप करुन मूळ घटनेवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आहे.   

भाजपच्या राज्यात दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावर अत्याचार वाढले असून त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करावी आणि हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा मागण्याही त्यांनी केल्या.

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

Balasaheb Thorat alleges Yogi Adityanath government on Hathras case