esakal | मुंबईत पर्यटनाच्या दागिन्यात नवा ‘मोती’
sakal

बोलून बातमी शोधा

माहीम रेतीबंदर

मुंबईत पर्यटनाच्या दागिन्यात नवा ‘मोती’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिक्रमण, बेकायदा पार्किंग, अस्वच्छता अशा विळख्यात अडकलेल्या माहीम रेती बंदरची आता चौपाटी झाली आहे. या समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, आजपासून हा नव्या रुपातील रेतीबंदर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. वादळाचा तडाखा रोखतील अशी सुरूची झाडे लावण्यात आली असून, त्याच बरोबर मुंबईत पहिल्यांदाच लाकडी साहित्यापासून तयार करण्यात आलेली खुली व्यायामशाळाही उभारण्यात आली आहे.

हेही वाचा: नियुक्ती बाबतचा निर्णय राज्यपालांनी आपल्या क्रुतीतुन दाखवावा;पाहा व्हिडिओ

मुंबईतील समुद्र किनारे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र, माहीमचा समुद्र किनारा हा नेहमीच दुर्लक्षित होता. परंतु, पालिकेने यात पुढाकार घेत चार कोटी रुपये खर्च करून या किनाऱ्याचे पर्यटन केंद्र तयार केले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सदा सरवणकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त हर्षद काळे, पोलिस उपायुक्त प्रणय अशोक, पालिका सहाय्यक आयुक्त किशोर दिघावकर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा: पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण; 233 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

कोस्टल रोडची रेती

माहीम येथे समुद्र किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली होती. ही धूप रोखण्यासाठी उपाययोजना करून या जागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. झालेली धूप भरून काढण्यासाठी पाच फूट उंचीपर्यंत रेती टाकण्यात आली. ही रेती किनारी मार्गाच्या (कोस्टल रोड) खोदकामातून निर्माण झालेली आहे. किनारा संरक्षण भिंतीचीही डागडुजी करण्यात आली असून त्यावर मुंबईच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी ललित चित्रे रेखाटण्यात आली आहेत. येथील पाच झोपडपट्टी धारकांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे.

हेही वाचा: मुंबईत बस मार्ग बदलल्याने प्रवाशांची झाली कोंडी; बेस्ट उपक्रमामुळे गोंधळ

चौपाटीच्या सौंदर्यात भर

१) वादळी हवेचा वेग कमी करण्याची क्षमता असणारे सुरूच्या झाडाच्या २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. टिकोमाची ३५० आणि चाफ्याची २०० तर बांबूची ३०० रोपे लावण्यात आली आहेत.

२) संपूर्ण सुशोभित किनाऱ्याभोवती बांबूचे कुंपण देखील लावण्यात आले आहे. तळहातामध्ये झाड जपल्याचे सुंदर असे नैसर्गिक शिल्प देखील साकारण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन सुरक्षित हातांमध्ये असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

३) समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी लावण्यात आलेले व्यायामाचे साहित्य व उपकरणे लाकडापासून बनवलेले आहे. तसेच किनाऱ्यावर दगडाची पायवाट बनविण्यात आली आहे.

४) माहीम किनारा परिसर न्याहाळता यावा, म्हणून सुमारे ३० मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा उभारण्यात आला आहे. या मनोऱ्यावरुन वांद्रे-वरळी सागरी सेतूसह अरबी समुद्राचे मनोहारी दृश्य पाहता येते.

loading image
go to top