
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे महानगरातील रस्त्यांची पुन्हा एकदा चाळण झाली आहे. रस्ते विभागाने नुकतेच भरलेले खड्डे पावसामुळे पुन्हा उघडले असून, त्यामुळे रस्त्यांवर रेती, सिमेंट, खडी पसरण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी, अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.