esakal | सचिनने रक्तदान शिबीर आयोजित करुन घालून दिला धडा
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar

सचिनने रक्तदान शिबीर आयोजित करुन घालून दिला धडा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोविडमुळं (covid) मोठी रक्तदान शिबिरं (blood donation camp) आयोजित करणं कठीण झालं आहे. त्यातच मुंबईत (Mumbai) रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे. रक्तदात्यांना, शासकीय संस्थांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकर (sachin tendulkar) यांनी सोमवारी १४ जूनला रक्तदानदिनाचं औचित्य साधून स्वत: रक्तदान केले. (Mumbai sachin Tendulkar sets an example with blood donation camp dmp82)

सचिनने स्वत:च छोटेखानी रक्तदान शिबीर आयोजित केलं. ज्यात त्याच्या स्टाफने रक्तदान केलं. नागरिकांनाही रक्तदान करण्याचे आवाहन सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. सचिनच्या SRT कंपनीतील प्रवक्त्याने सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी सचिनच्या एका जवळच्या नातेवाईकाला शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज होती. पण त्यावेळी रक्ताचा तुटवडा असल्याचा अनुभव सचिनच्या जवळच्या व्यक्तींना आला होता. त्यामुळे सचिनने महत्व समजून रक्तदान केलं.

हेही वाचा: मोठी कारवाई! अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती ED कडून जप्त

रक्ताची गरज असणाऱ्यांनाा रक्तदानाच्या माध्यमातून मदत होईल. तसंच सचिनच्या रक्तदानामुळं इतरांनाही प्रेरणा मिळेल.''सचिनला कोविडची बाधा झाली होती. त्यानंतर लगेच रक्तदान करता आलं नाही. त्याच्या कार्यालयातून सातत्याने 'थिंक फाउंडेशन 'या एनजीओला संपर्क करण्यात आला. त्यानंतर अखेर १४ जूनला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं. या शिबीरात त्यानं सहकाऱ्यांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले याचा आम्हाला आनंद झाला.'' असं थिंक फाउंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितलं आहे.

loading image